अरुंधती रॉय – एक ढोंगी विचारवंत

सध्या अरुंधती रॉय यांची एकापेक्षा एक ‘धाडसी’ विधाने, त्यांच्या या धाडसामुळे दिपून गेलेले माध्यमकर्मी, त्यांच्या अटकेची मागणी करणारे विरोधी पक्ष, इकडे आड तिकडे विहीर अशा अवस्थेतले सरकार या सगळ्यांनी केलेली आणि खोडलेली विधाने, आरोप, प्रत्यारोप यांचा धुरळा उडतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळाची करती स्त्री, अरुंधती रॉय, हिच्या हेतूंकडे, व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत या बाई? NDTV च्या प्रणव रॉय यांची चुलत बहिण, आणि केरळातल्या सिरीयन ख्रिश्चन महिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीतील हक्कांसाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढा देणाऱ्या मेरी रॉय यांची कन्या.  God of small things हे एक(मेव) पुस्तक लिहून त्यांना बुकर पुरस्कार, जागतिक वाचक वर्ग, आर्थिक सुरक्षितता, प्रसिद्धी, अशा अनेक गोष्टींचा लाभ झाला. पण दुर्दैवाने हा पुरस्कार दर वर्षी वेगळ्या व्यक्तीला दिला जातो. त्यामुळे रॉय बाईंवरचा प्रसिद्धीचा प्रकाशझोत कमीकमी होत गेला. मग त्या संस्कृत उक्ती प्रमाणे ‘तोड फोड करा, कपडे फाडा, गाढवावर बसा, (पण) येन केन प्रकारेण प्रसिद्धी मिळवा’ अशी त्यांची वागणूक सुरु झाली.

२००१ साली अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांनी हल्ला केला. बळींच्या नातेवाईकांचे अश्रूही वाळले नव्हते तोच, २९ सप्टेंबरला ‘गार्डियन’ मध्ये रॉय बाईंनी जाहीर केल – जॉर्ज बुश आणि ओसामा बिन लादेन यांच्या नैतिकतेमध्ये डाव-उजव करण्यासारखा फरक नाही. एका लोकशाही देशात निवडून आलेला राष्ट्रप्रमुख आणि एक ज्ञात अतिरेकी यांच्यात रॉय बाईंना काहीच फरक करावासा वाटत नाही.

ऑगस्ट २००२ मध्ये रॉय बाई पाकिस्तानात भेट देण्यासाठी गेल्या होत्या. तेथेच त्यांनी त्या भारतापासून फुटून निघून जगाच्या नागरिक झाल्याचे जाहीर केले. (त्या अजूनही भारताच्याच पासपोर्ट धारक आहेत). तिथल्या पत्रकारांनी काश्मीर प्रश्नाबद्दल छेडले असता त्यांनी उत्तर टाळले. अजून खोदून जेव्हा पत्रकारांनी काश्मीर बद्दल भूमिका विचारली तेव्हा आपल्याकडे कुठलाही ठोस उपाय नसल्याचे त्यांनी कबुल केले.

लगोलग, मार्च २००३ मध्ये अमेरीकेनी इराकवर हल्ला केला. रॉय बाई मे २००३ मध्ये न्यू यॉर्क मध्ये एका चर्चासत्रात रॉय बाई म्हणतात “अमेरीकेनी हल्ला करण्यापूर्वी इराकमध्ये आदर्श लोकशाही नांदत होती”

याचं रॉय बाई परवा दिल्लीत म्हणाल्या “भारतात लोकशाही असल्याचा केवळ आभास आहे”. त्या पुढे म्हणाल्या, “भुक्या नंग्या लोकांच्या भारतात राहायचं की फुटून ‘आझाद’ व्हायचं, हे काश्मिरी जनतेने स्वत:च ठरवावे. भारतातले सरकार  कोट्यावधी लोकांना दररोज २० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्नात जगायला भाग पाडतय.”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र भारतात पद्धतशीरपणे दुर्लक्षित ठेवले जाते, ते  भारतातले एक अत्यंत महत्वाचे विचारवंत होते”, असे एका पुस्तकाच्या (भिमायान – लेखक श्रीविद्या नटराजन, एस. आनंद) प्रस्तावनेत लिहिणाऱ्या रॉय बाईंना आंबेडकरांच्या घटना समिती समोरच्या ४ नोव्हेंबर च्या भाषणाची आठवण करून दिली पाहिजे. “भारतीय संघ राज्य हे घटक राज्यांच्या करारातून निर्माण झालेले नाही. त्यामुळे कुठल्याही एखाद्या राज्याला त्यापासून फुटून निघण्याचा अधिकार नाही.”

आचार विचार स्वातंत्र्याच्या नावाने रॉय बाई वेळी अवेळी गळे काढतात. आणि हे स्वातंत्र्य नसेल त्या त्याचा दुरुपयोग तरी कशा करणार? पण प्रवीण तोगडीयांच्या किंवा वरुण गांधींच्या अशाच स्वातंत्र्याबद्दल मात्र त्यांना फारसे प्रेम नाही. त्यांना ज्या माओवादी, काश्मीर फुटीरवादी, सद्दाम हुसेन शासित इराक, वगैरे लोकांबद्दल इतके उमले येतात, त्यांची विचार – आचार स्वातंत्र्याबाबतची मते आणि व्यवहारही रॉय बाईंना माहिती असेलच.

पण रॉय बाईंच्या या वेडेपणात एक सखोल विचार आहे – एखाद्या मोठ्या संस्थेवर/ व्यवस्थेवर कठोर टीका करून प्रसिद्धी मिळवता येते याची त्यांना कल्पना आहे. पण त्या त्यांचे शत्रू विचारपूर्वक निवडतात. कदाचित त्या सलमान रश्दींच्या ठेचेतून शहाणपणा शिकल्या असतील. त्यामुळे त्या चुकूनही अतिरेक्यांबद्दल काही बोलत नाहीत. जेथे लोकशाही औषधालाही नाही अशा देशांच्या वाटेला जात नाहीत. माओवाद्यांबद्दल अत्यंत प्रेमाने बोलतात.

त्या बोलतात त्या भारत आणि अमेरिकेसारख्या लोकशाही मूल्ये मानणाऱ्या देशात. कारण त्यांना खात्री आहे की हे समाज मतभेदांना स्वीकारणारे आहेत. त्यामुळे कितीही चिथावणीखोर भाषण केल, तरी फारस काही होणार नाही. खटला झालाच, अटक झालीच तर तासाभरात जामिनावर बाहेर येता येईल. काही दिवस तुरुंगात काढावेच लागले, तर देशभर मेणबत्ती मोर्चे निघतील. शिवाय मेगासेसे किंवा नोबेल पारितोषिकासाठी कदाचित वर्णी लागून जाईल! आणि हे समाज बऱ्यापैकी सुसंस्कृत असल्यामुळे हे फतवे काढून मृत्यूदंड ठोठावणार नाहीत, किंवा सैबेरियाच्या  छळछावण्यांमध्ये ‘पुनर्शिक्षणासाठी’ पाठवणार नाहीत.

अरुंधती रॉय, किंवा अशा अनेक ‘व्यवस्थेच्या विरोधात’ जाणाऱ्या, आणि चटपटीत इंग्रजी बोलणाऱ्या / लिहिणाऱ्या विचारवंतांच्या वागण्याचे थोडे खोलात जाऊन मूल्यमापन केले, तर त्यांच्या विचारसरणीचे काही मुडे आपल्याला मांडता येतील:

  • प्रसिद्धीची तीव्र लालसा
  • पण जीव धोक्यात घालण्याची गरज नाही
  • त्यामुळे मतभेद व्यक्त करण्याला वाव देणाऱ्या, उदार समाजात राहायचे, आणि त्या समाजावर कठोर टीकेचे आसूड ओढायचे, ही रणनीती.
  • कादंबरी लिहिताना जसे सत्य आणि कल्पित यांची सरमिसळ करण्याचे स्वातंत्र्य घेतो, तसेच वैचारिक लेख किंवा भाषण करतानाही बिनदिक्कत घ्यायचे. आपल्या विचारातल्या आणि अचारातल्या विरोधाभासाची चिंता करायची नाही. उलट आपल्यावर टीका करणाऱ्यांना विचार स्वातंत्र्याचे शत्रू ठरवून मोकळ व्हायचं
  • अतिरेक्यांच्या विरोधात काही बोलायचे नाही
  • वैचारिक झुंडशाही च्या विरोधात बोलायचे नाही
  • यामुळे प्रत्यक्ष त्रास देवू शकणारे शत्रू निर्माण होत नाहीत.
  • उदार समाजातल्या अनेकांना आपल्या समाजातील काही लोकांना हलाखीच्या परिस्थितीत राहावे लागते याबद्दल अबोध पातळीवर अपराध गंड असतो. हे लोक बंडखोर भाषा बोलणाऱ्या, पण एरवी उच्चभ्रू समाजात सहज वावरणाऱ्यांना सर्व प्रकारे मोठे करू शकतात.
  • ‘भारत हा महासत्ता वगैरे काही होणार नाही, कारण तो भुके कंगाल, चांगल-वाईट न समजणाऱ्या जंगली  लोकांचा देश आहे. यातले काही प्राणी जरी सरपटत कालीफोर्नीयात पोचले, तरी तो देश कायमच तमोयुगात राहणार आहे’ हे ऐकायला आवडणारा एक वर्ग पाश्चात्य राष्ट्रात आहे. त्यांना असे रेडीमेड ‘नेटीव’ विचारवंत हवेच असतात. त्यामुळे  वेगेवेगळ्या चर्चासत्रात जाऊन चमकायला आपल्याला चांगली संधी  मिळते. शिवाय आपल्या देशातल्या उच्चभ्रू समाजात यामुळे आपली किंमत वाढते, ती वेगळीच.

आता यांच्या या वागण्यावर उपाय काय? त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्या सोकावतील. शिवाय भारत हा ‘soft target’ असल्याचा समाज अजून दृढमूल होईल. त्यांना अटक केली, तर त्यांना आयती प्रसिद्धी मिळेल. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत, याचं इतकं उत्तम उदाहरण शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे माध्यमांचा उपयोग करून त्या त्यांचा अजेंडा पुढे रेटतात, त्याच प्रमाणे प्रस्थापित किंवा समांतर माध्यमांचा उपयोग करून त्यांची ढोंगबाजी सर्वांसमोर आणणे, आणि त्यांनी गृहीत धरलेली credibility त्यांना नाकारणे, इतकाच उपाय आपल्या हातात आहे. बाकी कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, आणि पाश्चात्य माध्यमांना तोंड देण्याची वेळ ज्यांच्यावर येते, ते त्यांचे काम करतीलच!

 

18 thoughts on “अरुंधती रॉय – एक ढोंगी विचारवंत

  1. Pramod Kulkarni May 15, 2014 / 11:26 am

    अतिशय छान, मर्मग्राही व नेमके विश्लेषण करणारा लेख… अभिनंदन अतुल..!

  2. Anushka March 13, 2013 / 3:06 pm

    Sundar lekh,achook vishleshan!
    He ase intellectuals Bhartaat rahun atyant snob ani ‘videshi’ perspective madhun Bhartaach chitran kartaat. No wonder tyana West madhe evdha importance ahe. Roy chya likhanala depth ajibat nahi. Ti fakta te uttam paddhatine present karte,evdhach.

  3. Rajesh G. Gade November 4, 2011 / 12:30 am

    फारच छान लेख लिहिल्याबद्दल व अरुंधती रॉय यांचेबद्दलचे समज – गैरसमज दूर करायला मदत केल्याबद्दल मन:पुर्वक धन्वाद. या अशा विकृत व “मी करेन ती पुर्व” वृत्तीच्या आणि तथाकथित विचारवंत लोकांमुळे समाजचे भले होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. काहीही कर्तृत्व नसतान एखाद्या चांगल्या विषय वा आंदोलनबद्दल वादग्रस्त विधानं करुन – भूमिका घेऊन लोकांना संभ्रमित करण्याच्या उद्योगात या बाई आणि त्यांच्यासरख्या मंडळींचा कोणी हात धरु शकत नाही. तेव्हा लोकांनीच या अशा विचारवंतांना सामाजिक प्रक्रियांपासून जाणीवपुर्वक चार हात लांबच ठेवायला हवे. पुनश्च धन्यवाद.

    राजेश जी. गाडे
    संस्थापक व मुख्य संयोजक
    आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
    9820440573/9869240573

  4. sunil adhate May 20, 2011 / 8:50 am

    sadetod lihilat.

  5. Mahesh Kankarej March 14, 2011 / 11:20 pm

    कमाल आहे !!
    ह्या बाई खरच विचारवंत आहेत?

    मला माहिती नाही पण वैचारीरिक व्याभिचार (Intellectual Prostitution) किंवा वैचारिक दहशत वाद असल्या संकल्पना असतील तर त्यावर खूप काम करण्याची गरज आहे. आणि बरीचशी तथाकथित विचारवंत मंडळी त्या वर्गात मोडतील.

    बरखा बाईंच उदाहरण घे ना, त्यांना पद्मश्री मिळाल, आणि ह्या बाई राडीआबाईंशी फोनवर द्रमुक च्या मंत्रिमंडळातल्या सहभागा विषयी ज्या पद्धतीने बोलत होत्या, ते ऐकून खूप लाज वाटली. खर तर आपापल्या व्यवसायाची प्रतिष्ठा & पावित्र्या (Integrity) जपण्याची जबाबदारी त्या त्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांची आहे. पण कुठला पुरस्कार, कुठल्या तरी समिती किंवा मंडळावरनेमणूक, अनुदान, सरकारी कोट्यातून प्लॉट/ घर इ साठी तथाकथिक विचारवंत मंडळी जेव्हा वाटेल त्या थराला जावू लागतील, तेव्हा असले तथाकथित विचारवंतांच पिक येईल. सध्या भारतात विचारवंत, आणि धर्मगुरूंच तण माजल आहे. हा काही निव्वळ योगायोग नाही.

  6. Kanchan Kodimela March 1, 2011 / 12:51 am

    Chaan lekh…. Agadi manatale bolalat!

    • अतूल पाटणकर March 1, 2011 / 2:06 pm

      प्रतिक्रिया कळवत राहा. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

  7. Charulata February 18, 2011 / 7:41 pm

    Truely agree with the thoughts.

    The only thing required is WE all should write, speak and give platform to the good and mature thoughts…..

    Like a popular thought in Marketing….buyers buys a commodity because he does not have other options. Let give the listeners a good commodity to listen, then only such BLA BLA its will keep their mouth shut.

    • atulpatankar February 18, 2011 / 9:36 pm

      Very well put, Charu. प्रतिक्रिया कळवत राहा. वाचक म्हणजे देव.

  8. manoj kulkarni February 15, 2011 / 9:10 am

    Very good atul keep it up

  9. aparna karmarkar December 1, 2010 / 6:23 pm

    Hi Atul. Excellent article.I have myself wasted few hours of life by reading ‘God of small things’ !!! The book is ‘mahabhikar’. Why don’t you post the same on ‘Maayboli’?

  10. sharadmani November 2, 2010 / 1:15 am

    मणी म्हणे…

    काय झाले तुला, बाळे अरुंधती
    उधळीशी किती, मुक्ताफळे

    काश्मिरवर म्हणे, हक्क फुटीरांचा
    माल हा बापाचा, वाटला का?

    एका बक्षिसाने, किती उडशील
    काय तोडशील, मातृभूला?

    ऐशा फुटीरांना, मारा पैजाराने
    तुक्याच्या जोडीने, मणी म्हणे

    -संत मणीमहाराज,
    मणिराम की छावणी,
    मणिपूर.
    ————————-

    तरुण भारत, मुंबई मधून साभार.

  11. Ashlesha November 1, 2010 / 2:33 pm

    Incredibly high-quality commentary…… Good U R revealing these concerns …. The most Anti National Woman Of Our Country………………how she can passes like these judgments………..idiot supports Afzal Guru the main accused in parliament attack case……….supports Islamic terrorists in Kashmir, Pakistan…………….she must use her freedom of expression at Pakistan where she will be killed.

  12. suhasvaidya November 1, 2010 / 11:01 am

    Very good article. All these so called intelligents have so many contradictions in their life and in their political and social views. Good you are exposing them one by one with the same tools and techniques they are used.

    Now i have become a regular reader of your blog.

  13. sharadmani, Mumbai, India November 1, 2010 / 10:51 am

    अतुल अभिनंदन,

    एकदम नेमकेपणाने लिहीलेला, सडेतोड व परखड लिहितानाही शब्दांचा (व स्वत:चा!) तोल न ढळू दिलेला असा उत्तम लेख. लिहीत रहा.

  14. MAHESH M SANAP October 31, 2010 / 1:39 pm

    Atulji good, must go on.

  15. Milind October 30, 2010 / 10:23 pm

    अगदी मनातलं बोललास, अतुल.
    God of small things वाचले, तेव्‍हाच ही बाई किती विकृत आहे हे लक्षात आले होते. पण आपल्‍या बहुसंख्‍य मित्रांनी ती जगद्विख्‍यात कादंबरी वाचायचे कष्‍ट घेतलेले नाहीत, फक्‍त बाईला बुकर मिळाले एवढेच वाचले आहे. बुकर तसेही सामान्‍य कुवतीच्‍या लोकांनाच अनेकदा दिले जाते. विक्रम सेठ हे एक उदाहरण आहेच. पण आंतरराष्‍ट्रीय उपद्रवकर्त्‍यांना मोठे करण्‍यासाठी बुकरने सगळ्यात मोठे योगदान दिले आहे ते या बाईच्‍या बाबतीतच.
    एखादे अर्धसत्‍य फुलोरेदार इंग्रजीत मांडून पामर वाचकांस दिग्‍भ्रमित करण्‍यात बाईंचे कौशल्‍य वाखाणण्‍याजोगे आहे. For greater common good हे नर्मदा आंदोलनावरचे पुस्‍तकही असेच आहे.
    अराजकवादी मंडळींना सध्‍या बराच बाजारभाव आहे. त्‍यात ही एक नतद्रष्‍ट पत्रावळ.
    एम् एफ् हुसैन कडे हिला पाठवावे, अशी मी अल्‍लाकडे दुवा मागतो.

Leave a reply to Kanchan Kodimela Cancel reply