भ्रष्टाचार विरोध आणि सेक्युलरधर्म

मागच्या महिन्यात अण्णांच्या जंतर मंतर वरच्या आंदोलनानंतर त्यातल्या एक एक नवीन पैलूंवर प्रकाश पडू लागला आहे. या आंदोलनाच्या नेतृत्वाने सेक्युलर प्रतिमेकडे पुरेसे लक्ष न पुरवल्यामुळे काही थोर मंडळींना म्हणे यात भाग घेता आला नाही. काय आहे यांची तक्रार? नरेंद्र मोदींचे प्रख्यात टीकाकार आणि सोनियांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे’ (NAC) सभासद, अमन बिरादरी नावाच्या संस्थेचे प्रमुख हर्ष मंडेर त्यांच्या Hindustan Times मधल्या लेखात म्हणतात,

“And yet why could I not actively join the demonstration at Jantar Mantar? First, the symbols and allies that the campaign chose disturbed me: the stage was decorated with a picture of Bharat Mata, almost identical to that propagated by the right-wing RSS”

या टीकेकडे, अण्णा हजाऱ्याच्या सहकाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने पाहिल्याचे आपल्याला लगेच लक्षात येईल. डेक्कन हेरॉल्ड मधल्या बातमीत म्हटलं आहे,

Anna Hazare’s anti-corruption movement will have a new symbol in the future with ‘Tiranga’ at the centre. The tricolour will replace the Bharat Mata image that was in the background set-up of the stage erected at Jantar Mantar on which Hazare was lying on a fast-unto-death for the Jan Lokpal Bill.

ही अशी गोंधळाची परिस्थिती परत परत होवू नये, म्हणून मी काही सूचना करतो. त्या सूचना, अरुणा रॉय, हर्ष मंडेर, शबाना आझमी, मल्लिका साराभाई, मेधा पाटकर, वगैरे साधू -संतांपर्यंत कोणी तरी पोचवा, प्लीज.

  1. भारत मातेच्या चित्रांवर बंदी आणावी. जर कोणाला पूजा करायचीच असेल तर त्यांनी एम एफ हुसैन यांनी काढलेले भारत मातेचे (?) नग्न चित्र वापरावे. या एका दगडात अनेक पक्षी मारले जातील. हिंदुत्ववादी लोकांचे नाक ठेचले जाईल. हुसेन समर्थक खुश होतील. भारत मातेचे चित्र हे तिच्या जनतेचे जास्त स्पष्ट आणि खुले प्रतिक बनेल. आणि भारत माता ही पूजनीय वगैरे काही नसून एक भोगवस्तू आहे, हे सर्वांना स्पष्टपणे लक्षात येईल.
  2. सध्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पण हिंदूंची एक देवी सरस्वतीचे मोर हे वाहन असल्याची समजूत आहे. शिवाय मोर पीस डोक्यात घालणारा कृष्णही हिंदूंचाच देव आहे. त्यामुळे यापुढे कोंबडा हा राष्ट्रीय पक्षी जाहीर करावा. सर्व जाती पंथांचे लोक त्याचा सारख्याच आवडीनी आस्वाद घेवू शकतात. शिवाय प्रत्येक अतिरेकी कारवाई नंतर भारत सरकारची chicken hearted प्रतिक्रिया ही नुसत्या चित्रांतून जास्त स्पष्टपणे दाखवता येईल
  3. राष्ट्रीय बोधचिन्ह, अशोक चक्र, यामध्ये एक कमळ दाखवले आहे. ते बदलण्याबाबत तातडीने विचार व्हावा.

स्वयंघोषित सिव्हील सोसायटी सदस्यांनी कृपया या मागण्यांचा विचार करून प्राणांतिक उपोषण वगैरे भानगडीत न पडता, देशभर साखळी मेणबत्ती मोर्चे आयोजित करावे. मेणबत्ती उत्पादक संघ आणि इलेक्ट्रोनिक मिडिया कंपन्या मिळून सगळं खर्च उचलू शकतात, हे सांगायची गरज नाहीच!

Advertisements

One thought on “भ्रष्टाचार विरोध आणि सेक्युलरधर्म

  1. Prashant Aranake April 28, 2011 / 7:10 pm

    भारत माता ही पूजनीय वगैरे काही नसून एक भोगवस्तू आहे, हे सर्वांना स्पष्टपणे लक्षात येईल.
    नाहीतरी भ्रष्टाचार करणारे, एक प्रकारे भारत मातेचा भोगदासी म्हणूनच वापर करतात, त्यामुळे ही कल्पना चांगली आहे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s