बाबल्या तुंबडा आणि आपण सगळेच…

Milind Thatte on forests and people

नाव बाबल्‍या तुंबडा. वय अदमासे 55. शिक्षण काही नाही. (म्‍हणजे पुस्‍तकी शिक्षण काही नाही, जंगलाचे शिक्षण अफाट). शेती आणि शिकार दोन्‍ही बापाकडून आणि आजाकडून शिकायला मिळाले. शेती हाच पोटाचा आधार. शेतीखाली असलेली जमीन सर्व चुलतभावडांमध्‍ये मिळून 52 एकर. त्‍यापैकी बाबल्‍याकाकाच्‍या वाट्याला सात एकर. या जमिनीवरून दर तीन-चार वर्षांनी लोकांना हुसकावण्‍याची मोहीम वनरक्षक काढतात. काही लोकांना अटक केली जाते, दंड भरल्‍यावर सुटका होते. काही जणांना नुसता दंड होतो. पण पिके सगळ्यांची नष्‍ट केली जातात. हातातोंडाशी आलेली नागली (नाचणी) आणि भात तुडवले जाते. शेतात बांधलेल्‍या झोपड्या जाळणे हा वनविभागाला फार आवश्‍यक वाटणारा कार्यक्रम आहे. या सर्व जमिनींवर वनविभागाने 1864 पासून पुढे अतिक्रमण केले आणि तिथपासून पुढे बाबल्‍या तुंबडा आणि अशा सर्वांना ‘अतिक्रमणदार’ ठरवण्‍यात आले. आपले पीक फॉरेस्‍टवाल्‍यांनी बरबाद करू नये, म्‍हणून दर वर्षी फॉरेस्‍ट गार्डांच्‍या व रेंजर साहेबांच्‍या घरी कमीत कमी एकेक पायली नागली, तूर, तांदूळ, उडीद असे धान्‍य प्रत्‍येक कुटुंबाने नेऊन ठेवायचे अशी पद्धतच होती. किमान तीन-चार पिढ्यांनी ही पद्धत पाळली…

View original post 1,177 more words

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s